आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:मनमाड रेल्वे कार्यशाळेस एक लाख रुपयांचे बक्षीस ; महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांनी केले जाहीर

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रेल्वे इंजिनिअरिंग वर्कशॉपने चांगले काम करून नाव कमावले आहे. कामाची ही प्रगती पुढेही निर्धाराने सुरू ठेवा, असे आवाहन करीत उत्कृष्ट कामाबद्दल मनमाड रेल्वे वर्कशॉपला एक लाख रुपयांचे बक्षीस मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांनी जाहीर केले.

त्यांनी शनिवारी मनमाड रेल्वेस्थानकाला भेट देऊन विविध कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर रेल्वे वर्कशॉपला त्यांनी भेट दिली व वर्कशॉपच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. वर्कशॉपच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दौंड-नगर-मनमाड दुहेरीकरण कामकाजाचा आढावा घेतला.

जळगाव-मनमाड-इगतपुरी या रेल्वेच्या तिसऱ्या लाइनच्या कामकाजाबद्दल अधिकारीवर्गाला सूचना केल्या. मनमाड रेल्वेस्थानकाजवळ नियोजित असलेल्या पॅनल इमारतीच्या कामकाजाच्या आराखड्याची त्यांनी पाहणी केली. दौंड-मनमाड दुहेरीकरणाच्या कामात अनकाई ते मनमाड रेल्वे स्टेशन या कामाचेही त्यांनी निरिक्षण केले.यावेळी मंडल रेल प्रबंधक एस. एस. केडिया, प्रधान मुख्य इंजिनिअर राजेश अरोरा, मनोजकुमार शर्मा, मुख्य अभियंता तरुणकुमार दंतोडिया, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...