आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सिन्नरला दुचाकी घसरून‎ एकाचा मृत्यू‎

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पुणे महामार्गावर‎ गोंदे शिवारात गतिराेधकावरून‎ दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडून मार‎ लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची‎ घटना घडली. बाळासाहेब लक्ष्मण‎ कळसकर (३६) रा. निऱ्हाळे असे‎ मृताचे नाव आहे. कळसकर व‎ समाधान भाऊसाहेब शेलार (३०) रा.‎ शिंदे, ता. नाशिक हे दुचाकी (एमएच-‎ १५ एचजे. ६४४९) ने सिन्नरकडे येत‎ होते.

गोंदे शिवारातील समृद्धी‎ महामार्गाच्या पुलाजवळील‎ गतिराेधकावर त्यांची दुचाकी घसरली.‎ त्यामुळे कळसकर हे रस्त्यावर पडून‎ गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या‎ मदतीने त्यांना उपचारासाठी‎ रुग्णालयात दाखल केले असता‎ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.‎ याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात नोंद‎ करण्यात आली असून अधिक तपास‎ सहायक उपनिरीक्षक अढांगळे करत‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...