आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी उन्हाळ, लाल व सफेद कांद्याची एकूण २१३ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्याच्या भावात घसरण सुरूच असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.
मंगळवारी (दि. ६) उन्हाळ कांद्याला किमान ३००, कमाल १०२६ तर सरासरी ७०० रुपये, लाल कांद्याला किमान ८५०, कमाल २०९० तर सरासरी १८०० रुपये सफेद कांद्याला किमान १७००, कमाल १९०० तर सरासरी १७०१ रुपये क्विंटल असे भाव होते. मक्याची २०८ नग आवक होऊन किमान १९२१, कमाल २०७१ तर सरासरी २०२० रुपये क्विंटल भाव मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.