आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी उन्हाळ, लाल व सफेद कांद्याची एकूण ३३१ ट्रॅक्टर इतकी आवक होऊन भाव पुन्हा एकदा घसरल्याचे दिसून आले. उन्हाळ कांद्याला ३०० ते ९२६ सरासरी ७५० रुपये क्विंटल, लाल कांद्याला ६०० ते १८९९ सरासरी १५०० रुपये क्विंटल तर सफेद कांद्याला ५०० ते १४७६ सरासरी १२०० रुपये क्विंटल असा भाव निघाला.
मक्याची १५० नग इतकी आवक झाली. १८७१ ते २०५४ सरासरी १९९१ रुपये क्विंटल असा भाव होता. शनिवारी उन्हाळ कांद्याला ८०० रुपये, लाल कांद्याला १८०० रुपये तर सफेद कांद्याला सरासरी १७७५ रुपये क्विंटल असे भाव होते. मंगळवारी मात्र उन्हाळ कांद्याच्या भावात सरासरी ५० रुपये, लाल कांद्याच्या भावात सरासरी ३०० रुपये तर सफेद कांद्याच्या भावात क्विंटलमागे ५०० रुपयांची घसरण झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.