आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम:श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित; स्वामी मुक्तानंद चा रोहन माहुलकर संस्कृतमध्ये प्रथम

येवला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी रोहन माहुलकर दहावी परीक्षेत संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम आला. याच विद्यालयाचा अभिषेक भांडगे ९४.८० टक्के गुण मिळवून येवला केंद्रात प्रथम आला. रोहन माहुलकर ९४.२० टक्के गुण मिळवून द्वितीय आला तर आर्या शेवाळे ही विद्यार्थिनी ९२ ६० टक्के गुण मिळवून तृतीय आली. अनुष्का मांडवडे ९२ टक्के मिळवून चतुर्थ तर वैभवी मिसाळ ९१.४० टक्के गुण मिळवून केंद्रात पाचवी आली.

मराठी माध्यम सेमी इंग्रजीचा निकाल शंभर टक्के लागला. इंग्रजी माध्यमाचा आणि बोकटे शाखेचा देखील निकाल शंभर टक्के लागला. इंग्रजी माध्यमातून सिद्धेश विखे ८८.८० टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आला. प्रथमेश पैठणकर ८८ टक्के गुण मिळवून दुसरा आला. आकाश पिंगळे आणि महेश शेख ८७.६० टक्के गुण मिळवून विद्यालय विद्यालय तृतीय आले. बोकटे विद्यालयातून काजल दीपक पाटील ९५ टक्के गुण मिळवून प्रथम आली.

आरती भाऊराव लासुरे ९४.२० टक्के गुण मिळवून दुसरी आली. तर प्रांजल बापूसाहेब दाभाडे बोकटे शाखेत ९३ टक्के गुण मिळवून तृतीय आली. मराठी माध्यमात १७२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत एकशे पाच विद्यार्थी आले. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे २१ विद्यार्थी विद्यालयात आहेत ;अशी माहिती प्राचार्य मनोहर कदम, उपप्राचार्य अरुण विभुते तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमृतसा पहिलवान, सेक्रेटरी संजय नागडेकर, खजिनदार सुधांशू खानापुरे यांनी ही माहिती दिली. गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या प्रांगणात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...