आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिन्नर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाने प्रत्येकी ६ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. मात्र, आशापूर, शास्रीनगर, वडगाव पिंगळाचे नवनिर्वाचित सरपंच स्थानिक आघाडीवर ठाम आहेत.
शहा, कीर्तांगळी, उजनी, पाटपिंप्री येथे कोकाटे गट तर नांदूरशिंगोटे, ठाणगाव, सायाळे, कारवाडी, डुबेरवाडी येथे वाजे गटाची सत्ता स्थापन झाली आहे.आशापूर ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सुलोचना सीताराम पाटोळे (३७६) यांनी द्रौपदा दशरथ पाटोळे (३६४) यांचा अवघ्या १२ मतांनी पराभव केला. नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा दीपक बर्के(१८५७) यांनी लंकावती विलास सानप (१८०४) यांच्यावर अवघ्या ५३ मतांनी मात केली. शहा ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत आमदार कोकाटे समर्थक सोपान जाधव (६१३) यांनी ४६ मतांनी बाजी मारली.
ठाणगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक व नामदेव शिंदे (१४३८) यांनी माजी सरपंच सीमा शिंदे यांचे पती ए. टी. शिंदे (७७०), प्रतिक रामचंद्र शिंदे (६२०) यांना पराभूत केले.
सायाळेत सरपंच निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक विकास शेंडगे (८२३) यांनी आमदार कोकाटे समर्थक अतुल शिंदे (५७९) यांचा २४४ मतांनी पराभव केला. वडगावपिंगळा ग्रामचंपायतीत सरपंचपदी शेवंताबाई वेणू मुठाळ, शास्त्रीनगरला (लोणारवाडी) सरपंचपदाच्या निवडणुकीत जयश्री सदाशिव लोणारे (६१६), पाटपिंप्रीत सरपंचपदाच्या निवडणुकीत नंदा रमेश गायकवाड यांनी अर्चना भाऊसाहेब गायकवाड यांना पराभूत केले.
कीर्तांगळी सरपंचपदाच्या निवडणुकीत कुसूम शांताराम चव्हाणके यांनी कांताबाई संपत चव्हाणके यांना पराभवाची धूळ चारली. कारवाडी सरपंचपदाच्या निवडणुकीत रुपाली नीलेश जाधव यांनी मीना शिवाजी जाधव यांना धोबीपछाड दिली. उजनी सरपंचपदाच्या निवडणुकीत निवृत्ती लहानू सापनर यांनी भाऊसाहेब भागवत सापनर यांचा पराभव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.