आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदवडला रास्ता रोको:विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध

चांदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपच्या वतीने चांदवड-मनमाड मार्गावरील शासकीय विश्रामगृहाजवळील गणूर चौफुलीवर रास्ता रोको करून अजित पवार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, गीता झाल्टे, प्रशांत ठाकरे, योगेश ढोमसे, डॉ. नितीन गांगुर्डे, युवा मोर्चा अध्यक्ष ॲड. शांताराम भवर, गणेश महाले, मुकेश कोतवाल आदी सहभागी झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...