आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:मालेगावी मोर्चा काढून अग्निपथ योजनेला विरोध; अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी

मालेगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लष्करात अल्पकालीन भरतीच्या अग्निपथ योजनेला विरोध वाढला आहे. विरोधाचे लोण महाराष्ट्रात पोहोचले आहे. शनिवारी सकाळी शेकडो तरुणांनी संघटितपणे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. येथे जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी करून प्रशासनाला निवेदन सोपविण्यात आले.

अग्निपथ योजनेच्या विरोधात विविध राज्यांमध्ये हिंसक स्वरूपाची निदर्शने सुरू आहेत. महाराष्ट्रातही आंदोलनांतून विरोध होत आहे. शहर व तालुक्यातील तरुणांनी कॉलेज मैदानापासून मोर्चा काढला. एकात्मता चौक, कॅम्परोडमार्गे मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे तरुणांनी आवारात ठिय्या देत अग्निपथ योजनेला कडाडून विरोध केला. ही योजना सुरू करण्याचा निर्णय रद्द करावा, सदर भारती प्रक्रियेच्या कुठल्याही अटी मान्य नसल्याचे स्पष्ट करत पूर्वीची नियमित भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली. तरुणांचा संताप पाहता अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आंदोलनस्थळी दाखल झाले.

त्यांनी आंदोलक तरुणांशी चर्चा करत आपल्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचविल्या जातील असे आश्वासन दिले. यानंतर तरुणांनी महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनात स्वप्नील सोनवणे, ऋषिकेश अहिरे, शरद खैरनार, ऋषिकेश काळे, पुष्कर शिंदे, महेश भामरे, सुशांत पठाडे, कल्पेश भामरे, वैभव वाघ, पुष्कर जगताप, राहुल खैरनार आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...