आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठराव:वडगाव-पिंगळात रेल्वे प्रकल्पाला विरोधचट; ग्रामसभेत ठराव आत्मदहन निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

सिन्नर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी तालुक्यात जमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात काही गावे अग्रेसर असून काही गावांमध्ये जमिनीच्या मूल्यांकनावरून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव-पिंगळा येथे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची ८ जून रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत सर्वच शेतकऱ्यांनी रेल्वेमार्ग जिल्हा मूल्यांकन समिती व महारेल कंपनी यांनी घोषित केलेल्या जमिनीच्या दराला विरोध करत चिंचोली व नानेगावप्रमाणे दर द्या अथवा प्रकल्प रद्द करा, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.

प्रशासकीय अधिकारी व महारेल कंपनी यांनी दडपशाही, हुकुमशाही, दहशतीच्या मार्गाने जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व बाधित शेतकरी आत्मदहन करतील वआगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येत आहे असा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. वडगाव-पिंगळा येथील शेतजमीन पूर्णपणे बागायती असून सर्व बाधित शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. वडगाव पिंगळा व चिंचोली ही दोन्ही गावे नाशिक महापालिका हद्दीपासून ६ ते ७ कि.मी. अंतरावर असून ती नगरविकास रचना आराखड्यात येत आहे.

शिवारात नाशिक साखर कारखान्याचा काही भाग येत आहे. प्रस्तावित रिंगरोड दोन्ही गावांतून जात आहे. गावातून कडवाचा पाट गेलेला आहे. तथापि, वडगाव पिंगळा येथील जाहीर केलेला शेतजमिनीचा दर चिंचोली व नानेगाव या दोन्ही गावांच्या तुलनेत अत्यल्प आहे. चिंचोली गावचे जिरायत शेतजमिनीला एक लाख ६१ हजार रुपये प्रति गुंठा दर जाहीर केला. वडगाव-पिंगळा येथे जिरायत शेतजमिनीचा प्रति गुंठा दर ७१ हजार रुपये आहे. इतका मोठा दरात फरक असल्यामुळे आमच्या गावातून जाणारा रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी ग्रामसेविका रेपाळ, पोलिसपाटील सागर मुठाळ, उपसरपंच ज्ञानेश्वर हरळे, शिवाजी दराडे, रामनाथ हुळहुळे, अंबादास सानप, संपत कासार, तानाजी सानप, ज्ञानेश्वर सानप, भास्कर सानप, सुकदेव चकणे, नारायण हुळहुळे, देवीदास भवार, विश्वनाथ चकणे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अजय हुळहुळे, सोमनाथ सानप, ज्ञानेश्वर हरळे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...