आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:प्रदर्शनात विद्यार्थिनींना मिळाल्या ऑर्डर, वस्तूंचीही विक्री; चांदवड तंत्रनिकेतनच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या विद्यार्थिनींचा उपक्रम

चांदवड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री एचएचजेबी तंत्रनिकेतनच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या विद्यार्थिनींनी बनविलेल्या विविध कलात्मक शोभेच्या वस्तूंचे प्रदर्शन येथील गुजराथ गल्लीतील विठ्ठल मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले.

तंत्रनिकेतनचे समन्वयक अरविंद भन्साळी व राजकुमार बंब यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेनुसार विद्यार्थिनींनी नावीन्यपूर्ण गुण व सृजनशीलतेचा वापर करून बनविलेल्या गृहोपयोगी सजावटीसाठीच्या सुंदर कलात्मक वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या. यात विद्यार्थिनींनी बनवलेल्या गारमेंट्स ज्वेलरी, आर्ट पीसेस, घरातील शोभेच्या वस्तू, अ‍ॅसेसरीज, फॅशनेबल कपडे, हँडमेड ज्वेलरी, हँडमेड वॉलपीस, फुलदाणी, पर्स, बॅग, पेंटींग, बॉटल आर्ट पिसेस, कॅनव्हास पेंटिंग, एम्ब्रॉयडरी, स्केचिंग आदी विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तूंचा समावेश होता. कला प्रदर्शनाचे उद्घाटन ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्ष रिंकू कासलीवाल, जयश्री कोकणे, प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे, उपप्राचार्य एस. एच. गौडा, सर्व विभागप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

कला प्रदर्शनात १०२ विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या, त्यांना प्राध्यापिका उर्मिला काळे, पी. डी. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात विद्यार्थिनींच्या अनेक वस्तूंची विक्री झाली तर काही वस्तूंच्या ऑर्डरही स्वीकारण्यात आल्यामुळे विद्यार्थिनींना स्वावलंबी होण्यास मदत झाली. यावेळी के. एस. सोनवणे, पी. बी. सैनी, व्ही. एन. पहाडे, पी. एस. धोंडगे, ए. ए. गिरी आदींसह शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

कलाप्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबिलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनचे समन्वयक अरविंदकुमार भन्साळी, सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी, तंत्रनिकेतनचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य राजेंद्रकुमार बंब यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...