आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाभूळगाव येथील एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येथे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह झाला. त्यात बेंगळूरु येथील प्रेटियन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने सहभाग नोंदवत गुणवत्तेच्या आधारे १६ विद्यार्थ्यांची कॅम्पसमधून नोकरीसाठी निवड केली आहे. त्यांना साडेतीन लाखांचे प्रारंभिक पॅकेज देण्यात आले.
महाविद्यालयात संगणक, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या एकूण ६६ विद्यार्थ्यांनी या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग नोंदविला. ड्राईव्हमध्ये गट चर्चा व टेक्निकल मुलाखत असे दोन राउंड झाले. यातून मॅकेनिकल विभागातील विशाल मांडवले, ऋषिकेश जोरवर, तुषार लहरे, इलेक्ट्रिकल विभागाच्या प्रमोद वाबळे, शुभम जगताप, सागर काळे, कॉम्प्युटर विभागाच्या श्रद्धा बोरणारे, अक्षदा साताळकर, वैष्णवी भावसार, हर्षित गायकवाड, मयूर रुणवाड, प्रतीक जगताप, स्वप्निल वैद्य तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या गीतांजली माळी, आकांक्षा माळोकर, पवन सोनवणे यांची निवड झाली आहे. त्यांना वार्षिक ३ लाख ५० हजार पॅकेज देण्यात आले. प्रकल्प व्यवस्थापक सलमान अझिया यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखत घेतल्या. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांनी काैतूक केले. या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या प्राचार्य व विभागप्रमुखांनी काैतूक केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.