आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण साेहळ्याने भाविकांचे वेधले लक्ष:लासलगावी पालखी व रिंगण सोहळा; संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

लासलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त शहरात पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्याने भाविकांचे लक्ष वेधले.विद्यानगर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री साईबाबा मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. सुमतीनगर, अमृतनगर, विद्यानगर या भागातून पालखी नेण्यात आली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात खादगाव येथील विश्वास महाराज आहेर, शैलेश महाराज यमगर, अंबादास शिंदे, गिरीश बोरसे, गंगाराम शिंदे, तुळशीराम आव्हाड यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.

नाभिक समाजाच्या महिला पदाधिकारी सारिका सुर्वे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास श्रीराम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अशोकराव होळकर, नामकोचे माजी उपाध्यक्ष प्रकाश दायमा, शंतनू पाटील, बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सोनिया होळकर, महिला दक्षता समिती अध्यक्ष वेदिका होळकर, ग्रामपंचायत सदस्या रेवती होळकर, योगिता पाटील, स्मिता कुलकर्णी, शैलजा भावसार, श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अरविंद देसाई, मनोहर वाघ, अनिल वाघ, अभिजित जगताप, नितीन वाघ, डॉ. दत्ता मोटेगावकर, संदीप वाघ, शशिकांत महाले, सुखदेव वाघ, रमेश वाघ, अशोक जगताप, केशव देसाई, उषा मोटेगावकर, मंदा वाघ, तुषार जगताप, मयूर देसाई, अविनाश देसाई, सुनील वाघ, दत्ता वाघ, भरत वाघ, भगवान संत, रवींद्र वाघ, दिलीप देसाई, गिरीश बोरसे, नामदेव दरेकर, दत्ता बोरसे, गणेश महाले, संकेत वाघ, यांच्यासह पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व समाज बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...