आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक उत्सव:चंदनपुरीत देवतांच्या मुखवट्यांची आज‎ पालखी मिरवणूक आणि महापूजा‎

मालेगाव‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेजुरी येथील खंडोबा देवस्थान येथून प्रज्वलित‎ करण्यात आलेली मशाल ज्योत गुरुवारी चंदनपुरीच्या‎ सीमेवर पोहोचली. येथे सरपंच विनोद शेलार व‎ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी देवाचे पुजारी तसेच‎ मशाल ज्योतचे स्वागत केले. या मशालने खंडोबा‎ मंदिरातील मुख्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली.‎ शुक्रवारी यात्रेनिमित्त गावातून देवतांच्या मुखवट्यांची‎ पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.‎

पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महापूजा होऊन‎ यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.‎ चंदनपुरी येथील खंडोबा उत्तर महाराष्ट्राचे‎ ग्रामदैवत आहे. चंदनपुरीच्या यात्रेला जिल्ह्यातील‎ तसेच राज्यभरातील भाविक येतात.

दि.१ जानेवारी‎ रोजी मंदिराचे पुजारी तुकाराम सूर्यवंशी, रामकृष्ण‎ सूर्यवंशी, सदाशिव सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी‎ यांनी जेजुरी येथे खंडोबा मंदिरातून मशाल ज्योत‎ पेटवून ही पदयात्रा चंदनपुरी कडे रवाना झाली होती.‎ गुरुवारी सकाळी हे यात्रेकरू चंदनपुरीच्या सीमेवर‎ पोहोचले. येथे ग्रामपंचायत पदाधिकारी व‎ ग्रामस्थांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...