आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी मान्य‎:सिन्नर - शिर्डी महामार्गावर पाथरे‎ ग्रामस्थांचा तासभर रास्ता रोको‎

सिन्नर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथरे गावात जाणाऱ्या रस्त्यावर‎ दोन्ही बाजूने गतिरोधक टाकावेत,‎ पोहेगाव रस्त्यावर वाहतूक बेट‎ विकसित करावे यासह विविध‎ मागण्यांसाठी माजी जिल्हा परिषद‎ सदस्या सिमंतीनी कोकाटे यांच्या‎ नेतृत्वाखाली पाथरे ग्रामस्थांनी‎ सिन्नर -शिर्डी महामार्गाचे काम‎ करणाऱ्या कंपनी विरोधात रास्ता‎ रोको आंदोलन केले. सोमवारी‎ (दि. ६) सकाळी ९ ते १० वाजे‎ दरम्यान तासभर चाललेल्या‎ आंदोलनामुळे सिन्नर - शिर्डी‎ महामार्ग ठप्प झाला होता.‎ आंदोलकांनी केलेल्या मागण्या पूर्ण‎ करण्याचे आश्वासन माॅन्टो कार्लो‎ कंपनीने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या‎ उपस्थितीत दिल्यानंतर हे आंदोलन‎ मागे घेण्यात आले.

‎सिन्नर - शिर्डी महामार्गावर पाथरे‎ बस स्थानकाच्या दोन्ही बाजूने‎ स्पीड ब्रेकर टाकावेत, पोहेगावकडे‎ जाण्यासाठी वाहतूक बेट तयार‎ करावे, सायाळे बहादरपूरला‎ जोडणाऱ्या रस्त्यांना कट पॉईंट‎ ठेवावा, सायाळे रस्त्याच्या‎ पुलाखालून पादचारी मार्ग करावा‎ या मागण्यांसाठी हे आंदोलन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्यात आले. या संदर्भात मॉन्टो‎ कार्लो कंपनीला वारंवार सांगूनही‎ त्यांच्याकडून तोडगा काढला जात‎ नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले‎ होते.

त्यामुळे सोमवारी पाथरे बुद्रुक,‎ पाथरे खुर्द आणि वारेगावच्या‎ ग्रामस्थांनी एकत्र येत रास्ता रोको‎ आंदोलन केले. ग्रामस्थांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रेट्यापुढे कंपनीला नमते घेत सर्व‎ मागण्या मान्य कराव्या लागल्या.‎ ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर‎ येऊन महामार्ग दोन्ही बाजूने बंद‎ केला. परिणाम स्वरूप रस्त्याच्या‎ दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच‎ लांब रांगा लागल्या होत्या.

... तर १५ दिवसांत पुन्हा आंदोलन‎
पाथरे हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने बसस्थानक परिसरात‎ प्रसाधनगृह बांधावेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथदीप बसविण्याची मागणीही‎ ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांच्या या मागणीबाबत कंपनी गंभीर असल्याचे‎ संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व मागण्या १५ दिवसांच्या आत पूर्ण‎ कराव्यात, अन्यथा पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा‎ ग्रामस्थांनी दिला.‎

बातम्या आणखी आहेत...