आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सावकी येथील पाटील कुटुंबियांनी कांदाचाळीत बसवले यंत्र; सेन्सर शोधणार चाळीतील सडका कांदा

देवळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीत साठवलेला कांदा अनेकदा खराब होतो आणि शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. मात्र, नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकीच्या सुरेश पाटील आणि प्रकाश पाटील या शेतकऱ्यांनी त्यावर नामी शक्कल शोधली आहे. या शेतकऱ्यांनी सडका कांदा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कांदाचाळीत बसविले आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल, अशी आशा या शेतकऱ्यांना आहे. देवळा परिसरातील हा पहिलाच प्रयोग असून परिसरातील शेतकरी हा प्रयोग पाहण्यासाठी गर्दी करत आहे. असे ओळखते खराब कांदा
कांद्याला अधिकचा दर मिळावा म्हणून कांद्याची साठवणूक ही चाळीत केली जाते. राज्यात सर्वाधिक कांदाचाळी नाशिक जिल्ह्यातच आहेत. सुरेश पाटील व प्रकाश पाटील यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे कांद्याच्या आर्द्रतेबाबत प्रमाण तसेच अमोनिया आणि इतर वायूंमुळे चाळीतील कांदा कोणत्या भागात खराब होतो याचा अंदाज सेन्सरद्वारे येतो. त्यामुळे खराब झालेला कांदा ताबडतोब लक्षात येऊन तो बाहेर काढला जाऊन बाकीचा कांदा खराब होण्यापासून वाचवता येतो.

शासनाच्या सहकार्याची अपेक्षा
खराब होणारा कांदा शेतकऱ्यांची आर्थिक गणिते चुकवतो. कांदा खराब होत आहे हे कळेपर्यंत बराच कांदा सडतो. त्यासाठी हे सेन्सर तंत्रज्ञान महत्त्वाचे काम करते. त्यामुळे पुढील काळात ही यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचण्यासाठी शासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. - कल्याणी शिंदे, संचालिका, गोदाम इनोव्हेशन
आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे
प्रयोगशील शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. कांदा साठवणूक करणे, टिकवणे यासाठी आम्ही ही सेन्सर यंत्रणा चाळीत बसवली आहे. तिची उपयोगिता निश्चितच सिद्ध होईल, असा विश्वास आहे.
-प्रकाश पाटील, शेतकरी, सावकी

बातम्या आणखी आहेत...