आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापवारवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत भोये यांची तडकाफडकी नाशिक नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी २० जूनला हा आदेश दिला आहे. पवारवाडीचा पदभार उपनिरीक्षक पवन सुपनर यांच्याकडे तात्पुरता सोपविण्यात आला आहे. भोये यांची अचानक उचलबांगडी झाल्याने पोलिस दलात चर्चांमधून कारवाईचे ‘अर्थ’ लावले जात आहेत.
प्रभारी अधिकारी भोये यांच्यावरील चौकशीच्या अनुषंगाने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. पुढील आदेश होईपर्यंत भोये संलग्न राहतील. त्यांच्याविरोधात नेमकी कुठली चौकशी सुरू आहे याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. भोये यांनी डिसेंबर २०२० मध्ये पवारवाडीचा पदभार स्वीकारला होता. गत दीड वर्षापासून ते कार्यरत होते. त्यांच्या पूर्वी तत्कालीन निरीक्षक गुलाबराव पाटील यांचीही उचलबांगडी झाली होती. पाटील यांच्या कार्यकाळात एका कर्मचाऱ्याने पाच हजाराची लाच स्वीकारली होती. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवल्याचा ठपका ठेवून त्यांनाही नाशिक नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.