आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:अगोदर पुरेसा मोबदला द्या‎ मगच ऑनलाइन हजेरी घेऊ‎

येवला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अगोदर मागण्या पूर्ण करा, प्रलंबित‎ अनुदान द्या व पुरेसा मोबदला द्या,‎ मगच ऑनलाइन पद्धतीने हजेरीची‎ सक्ती करा, अशी मागणी ग्रामरोजगार‎ सेवक संघटनेने केली आहे.‎ येथील गटविकास अधिकारी‎ अन्सार शेख यांना दत्तात्रेय चव्हाण,‎ सुनील कदम, गीताराम आव्हाड,‎ दीपक भडकवाड, श्रीराम कांगने,‎ प्रवीण पाटील, अशोक यादव, नरहरी‎ मोरे, सुदाम कांबळे, रवींद्र उशीर‎ आदींच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन‎ देण्यात आले.

केंद्र सरकारने महात्मा‎ गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी‎ योजनेच्या कामात पारदर्शकता‎ आणावी, यासाठी वैयक्तिक‎ लाभाच्या योजना वगळता सार्वजनिक‎ ठिकाणी होणाऱ्या कामांवर काम‎ करणाऱ्या मजुरांची हजेरी ऑनलाइन‎ पद्धतीने (एन.एम.एम.एस) घेण्याचा‎ आदेश पारित केला असून या‎ ऑनलाइन हजेरी घेण्याच्या कामाच्या‎ पद्धतीला ग्रामरोजगार संघटनेने विरोध‎ दर्शविला असून ग्रामरोजगार‎ सेवकांच्या प्रलंबित असलेल्या‎ मागण्या सरकार जो पर्यंत पूर्ण करत‎ नाही, तो पर्यंत हे काम न करण्याचा‎ इशारा संघटनेने दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...