आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्शन अदालत:सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित‎ प्रश्न लवकरच मार्गी लावणार‎

कळवण‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या कारणांनी आजपर्यंत‎ सेवनिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित‎ राहिले आहेत. असे आजच्या पेन्शन‎ अदालतीवरून निदर्शनास आले आहे.‎ परंतु यापुढे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे‎ कोणतेच प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत.‎ याची काळजी कार्यालयाकडून घेतली‎ जाईल, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी‎ विशाल नरवाडे यांनी दिले.‎ आदिवासी आयुक्तालयामार्फत सुरु‎ करण्यात आलेल्या आदिवासी विकास‎ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय‎ आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व‎ वसतिगृह येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची‎ पेन्शन अदालत पंचायत समितीच्या‎ सभागृहात पार पडली.

त्यावेळी ते बोलत‎ होते.‎ आजच्या पेन्शन अदालतीत उपस्थित‎ पेन्शनर्समधील काहींना काही अडचणी‎ आहेत. ही खेदाची बाब आहे, पुढील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पेन्शन अदालत तीन महिन्यांनी होईल.‎ तोपर्यंत सर्वच कामे झालेली असतील,‎ असे नरवाडे यांनी सांगितले. यावेळी‎ सहायक प्रकल्प अधिकारी आर. आर.‎ पाटील, डी. व्ही. कालेकर, लेखाधिकारी‎ एस बी बर्वे, पेन्शन अदालत अध्यक्ष एस.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ के. पगार, विभागीय अध्यक्ष एस. एस.‎ खैरनार, वाय. के. खैरनार, डी. एस.‎ जगताप, एम. जी. अहिरे, जे. एम.‎ बच्छाव, सुभाष पाटील, एस. सी. देवरे,‎ किशोर हिंगे आदीं।सह सेवानिवृत्त‎ कर्मचारी उपस्थित होते.‎

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर हाेण्यास हाेणार मदत‎
कळवण प्रकल्पात २०१६ ते २०२३ या काळात वेगवेगळ्या पदावर काम करणारे ४५०‎ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या अडीअडचणी आहेत. पेन्शन अदालतीमुळे‎ सर्वच अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.‎ - एस. के. पगार, अध्यक्ष, पेन्शन अदालत

बातम्या आणखी आहेत...