आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील होलसेल किराणा दुकानात कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्याने मार्केटिंगचे असलेले चार लाख २७ हजार रुपयांची रक्कम स्वत:च मित्राच्या मदतीने लंपास करून लुटीचा बनाव करणाऱ्या संशयित कर्मचारी व त्याच्या साथीदाराला पिंपळगाव बसवंत पाेलिसांनी पाच तासांतच या घटनेचा उगलडा करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव परिसरातील शिरसगाव येथील जगदीश निवृती मोरे हा ओझर येथील गुरूकृपा इंटरप्रायजेस या साबनाच्या एजन्सीची मार्केटींग करत होता. रविवार (दि. १९) कलेक्शन केलेले ४ लाख २७ हजार रुपये संशयित मोरेकडे जमा झाले होते. एजन्सीचे मालक नितीन बनाईत यांनी ही रक्कम जमा करण्याचे सांगितले असता संशयिताने सोमवारी (दि. २०) ही रक्कम बँकेत जमा न करता स्वतःकडेच ठेवली. त्यानंतर सोमवार सकाळी १० वाजता कोकणगाव नजीक दोन अज्ञात इसमांनी माझ्यावर ब्लेडने वार करत माझ्याकडील ४ लाख २७ हजार रुपयांची रक्कम लुटल्याचा बनाव करत पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात फिर्यांद दिली. मात्र, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांनी संशयित मोरेच्या डाव्या हातावर ब्लेडचे वार बघितल्याने त्यांना संशय आला. त्यांनी खाकीचा दम दाखवताच संशयिताने गुन्हा कबूल केला.
घटनेत सहकार्य करणारे संशयित साहिल पटेल (ओझर), मुज्जफिर खान (नाशिक) यांनाही पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडील ४ लाख २७ हजार रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, सहायक निरीक्षक कुणाल सपकाळ, पोलिस नाईक मिथून घोडके, पप्पू देवरे, नितीन जाधव, गोकुळ खैरनार आदींनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.