आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामचरीत मानस आणि आपल्या आयुष्यातील घटनांची सांगड घातली तर जीवन यशस्वी होईल. दररोज १० मिनिटे साधना केल्यास जीवन बदलून जाईल. आत्महत्या कमी होतील. मनावर ताबा मिळून जीवन सफल करायचे असेल तर विहंगम योगाची आज समाजातील सगळ्या घटकांसाठी गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय संत किशनलाल शर्मा यांनी केले.
विहंगम योग संस्थानच्या वतीने देवपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्संग कार्यक्रमात ‘विहंगम योगाचे तत्त्वज्ञान आणि साधना’ या विषयावर किसनलाल शर्मा बोलत होते. स्वर्गीय विश्वनाथ गडाख यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विहंगम योगाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून देवपूर विद्यालयात उद्योजक विवेक गडाख, संतोष गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजनासाठी आण्णासाहेब गडाख, विजय गडाख आणि राजेश गडाख यांनी पुढाकार घेतला. विहंगम योगाचे कोषाध्यक्ष जयंत होनराव यांनी विहंगम योगसाधनेबद्दल माहिती दिली. ज्योती पाटील, आशा गडाख, सरपंच वनिता गडाख, सुखदेव गडाख, बाळासाहेब धरम, शरद गडाख, दौलत गडाख, चंद्रभान खोले, पुंजाहरी खोले, जुगल गवळी, काशीनाथ गडाख, नवनाथ गडाख, चंद्रभान गडाख, गणेश ढोले, सुधाकर चव्हाणके, राजू गडाख, वसंत दिवे आदींनी साधना केली. सत्संग कार्यक्रम यशस्वितेसाठी तुषार गडाख, सागर गडाख, दीपक गडाख, विकास गडाख, अजय गडाख, सोपान गडाख, अनिल गडाख यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.