आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिंपळगाव आगाराची ३० वर्षांपासून सुरू असलेली दिंडोरी-वरखेडामार्गे पिंपळगाव जाणारी शालेय वेळेतील बस रस्ते खराब असल्याच्या कारणास्तव अचानक बंद झाली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेची गैरसोय झाली आहे. बससेवा दहा ते पंथरा दिवसांपासून अचानक बंद केल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बस बंद झाल्याने शैक्षणिक नुकसान होऊ नये व वेळेत शाळेत जाता यावे यासाठी विद्यार्थी मिळेल त्या साधनाने प्रवास करत आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दखल घेतली जात नाही. एकीकडे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे अन् दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी साेयीची असलेली बस बंद केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
दिंडाेरी, वलखेड फाटा, लखमापूर फाटा, परमोरी, वरखेडा, कादवा सहकारी साखर कारखाना, सोनजांब फाटा, बोपेगाव व खेडगाव इत्यादी गावांतून शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, सरकारी कामे, हॉस्पिटलमध्ये उपचार, बाजारपेठा व अन्य कामांसाठी जाणारे नागरिक आदी प्रवाशांची संख्या मोठी आहे.
मात्र बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे. बस नियमित सुरू करावी, अशी मागणी हाेत असून, लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने, प्रवासी व विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुढील आठवड्यात बस हाेणार पूर्ववत पिंपळगाव आगारातर्फे सर्व मार्गांच्या बससेवा नियमित सुरू आहे. मात्र नळवाडी येथे बस सुरू केल्यामुळे वरखेडामार्गे बस बंद करण्यात आली आहे. पुढील अाठवड्यात बस पूर्ववत केली जाईल. - मनाेज गाेसावी, अागार व्यवस्थापक पिंपळगाव
बस त्वरित सुरू करावी, अन्यथा रास्ता राेकाे
शालेय विद्यार्थ्यांना ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टर अथवा बैलगाडीतून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शालेय वेळेत बससेवा बंद केल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना उपचारासह इतर शासकीय कामांसाठी जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. ही बससेवा त्वरित सुरू करावी. अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल. - केशव वाघले, सरपंच, वरखेडा
बस बंद झाल्याने शैक्षणिक नुकसान
आम्ही दररोज वरखेडा येथून कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात जाताे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून शालेय वेळेत पिंपळगाव येथे जाणारी बस बंद झाल्याने व अनियमित बससेवेमुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत असून त्वरित दखल घ्यावी. - समृद्धी गांगुर्डे, विद्यार्थी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.