आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर‎‎:पिंपळस ते येवला रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण‎

येवला‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हायब्रीड अॅन्युटी मॉडेल प्रकल्पातून‎ नाशिक-निफाड-येवला या चौपदरी‎ रस्त्याचे पिंपळस ते येवलादरम्यान‎ काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रकल्प‎ अहवाल बनविण्यासाठी शासनाने‎ मंजुरी दिली आहे.‎ या रस्त्याच्या काँक्रिटीकरण‎ प्रकल्पाचा डीपीआर तयार‎‎‎‎ करण्यासाठी राज्याच्या‎ अर्थसंकल्पातून ५६ लाख रुपयांचा‎ निधी मंजूर करण्यात आला आहे.‎ त्यामुळे नाशिक-निफाड-येवला‎ रस्त्याच्या सुधारणेच्या कामाचा मार्ग‎ अखेर मोकळा झाला आहे.‎ पाच वर्षांपासून या रस्त्यावर‎ प्रचंड खड्डे निर्माण होऊन मोठ्या‎ प्रमाणात रस्ता नादुरुस्त झाल्याने‎ अनेक अपघात होत होते.‎

वाहतुकीस अनेक अडचणींचा‎ सामना करावा लागत असल्याने‎ रस्त्याच्या नूतनीकरणासाठी‎ आमदार छगन भुजबळ यांचे‎ शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरू‎ होता. त्यातून आशियाई विकास बँक‎ अर्थसहाय्यीत महाराष्ट्र रस्ते‎ सुधारणा प्रकल्पांतर्गत या रस्त्याची‎ सुधारणा करण्यास मंजुरी मिळाली‎ होती. दरम्यान, सरकार‎ बदलल्यानंतर हा प्रकल्प रेंगाळला‎ होता. या प्रकल्पासाठी भुजबळ‎ यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यानंतर या‎ प्रकल्पास पुन्हा हायब्रीड अॅन्युटी‎ मॉडेल प्रकल्पातून सविस्तर प्रकल्प‎ अहवाल बनविण्यासाठी शासनाची‎ मंजुरी मिळाली. त्यासाठी‎ अर्थसंकल्पातून ५६ लाख रुपयांचा‎ निधी मंजूर करण्यात आला आहे.‎ यामध्ये नाशिक-निफाड–येवला‎ रस्ता १७९ ते २०९ किलोमीटर म्हणजे‎ पिंपळस ते येवला या भागाचा‎ समावेश आहे.‎

बातम्या आणखी आहेत...