आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदारासह प्रशासनाचे दुर्लक्ष:अंडरपासखाली 2 ते 3 फूट खोलीचे खड्डे

सिन्नर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळवड ते पाटोळे या रस्त्यावर समृद्धीच्या अंडरपास खाली जोरदार पावसामुळे दोन ते तीन फूट खोलीचे खड्डे पडले आहे. त्यांचा अंदाज न आल्याने तीन-चार अपघातही झाले आहेत. हा अंडरपास दुरुस्त करण्यासाठी समृद्धीच्या ठेकेदारासह प्रशासनाला वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी धुळवड ते पाटोळे रस्त्याचा वापर केला गेल्याने हा डांबरी रस्ता खराब झाला आहे. पाटोळे येथील खताळे वस्तीजवळ असलेल्या अंडरपास खाली पावसाचे पाणी साचून मोठमोठे खड्डे पडले आहे. गुरुवारच्या जाेरदार पावसाने त्यात आणखी भर पडली आहे. येथील भराव वाहून गेल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हा अंडरपास अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे.

या भागात तीन-चार अपघात झाल्याने ग्रामस्थांनी ठेकेदाराकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. एमएसआरडीसीलाही या संदर्भात कल्पना देवूनही अधिकारी या रस्त्याकडे फिरकले नाहीत. ठेकेदारही ग्रामस्थांना जुमानत नाही. पावसाळा सुरू असून या अंडरपास खाली पाणी साचते. दोन फूट खोलीचे हे खड्डे असल्यामुळे त्यात पावसाच्या पाण्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही. परिणामी छोटे मोठे अपघात घडत आहेत. शाळकरी मुलेही या खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाले आहेत. ठेकेदाराकडून अंडरपास खालील रस्ते बुजवावेत व रस्ता दुरुस्त करून द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दुरुस्ती न झाल्यास आंदोलन
अंडरपासखाली पडलेल्या खड्ड्यांमुळे या भागातील नागरिकांचा प्रवास खडतर बनला आहे. समृद्धीचे अधिकारी, ठेकेदार यांनी तातडीने या अंडरपासची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- रामहरी खताळे, ग्रामस्थ, पाटोळे

बातम्या आणखी आहेत...