आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मालेगावी गिरणा पुलावर फलक लावून तंबीवजा सूचना; स्टंटबाजांना महापालिकेचा इशारा

मालेगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी पावसाळ्यात गिरणा व माेसम नद्या दुथडी भरून वाहतात. नद्यांमध्ये पाेहण्यासाठी बरेच तरुण स्टंटबाजी करताना आढळून येतात. मागील महिन्यात एका तरुणाने थेट गिरणा पुलावरून नदीपात्रात उडी मारली हाेती. यात तरुणाचा मृत्यू झाला हाेता. हे प्रकार जिवघेणे ठरत असल्याने महापालिकेने अशा स्टंटबाजांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. गिरणा पुलाच्या चारही बाजूला मराठी व उर्दू भाषेतील फलके लावून सूचनावजा तंबी देण्यात आली आहे.

शहरालगतच्या काेल्हापूर टाइप बंधाऱ्यावर नागरिकांची नेहमीच गर्दी असते. गिरणा नदीला पूरपाणी आले की या गर्दीत वाढ हाेते. काही तरुण पाेहण्यासाठी पुलावरून उड्या मारत असतात. या तरुणांना आवर घालण्यासाठी प्रसंगी पाेलिस बंदाेबस्त तैनात करावा लागताे. गेल्या महिन्यात अशीच स्टंटबाजी करत नईम अहमद माेहम्मद अमीन या तरुणाने गिरणा पुलावरून नदीपात्रात उडी घेतली हाेती. प्रवाही पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला हाेता. स्टंटबाजीचे वाढते प्रकार राेखण्यासाठी मनपा प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणी नदीपात्रात उड्या मारताना आढळून आल्यास तसेच पुलावर विनाकारण उभे राहून गर्दी केल्यास कारवाई केली जाणार आहे. नदीपात्रालगतच्या इतरही काही ठिकाणी असे फलक लावण्यात आले आहे.

गर्दीवर नियंत्रण हवे
मालेगावी दरराेज सायंकाळी गिरणा नदीवरील पुलालगतच्या काेल्हापूर टाइप बंधाऱ्यावर नागरिकांची गर्दी असते. शुक्रवारच्या दिवशी गर्दी नियंत्रणाबाहेर जाते. केवळ पाणी बघण्यासाठी नागरिक कुटुंबासह येथे येत असतात. पुलाच्या कठड्यांजवळ उभे राहून गर्दी करतात. या समांतर पुलांवरून दुहेरी वाहतूक सुरू असते. गर्दीमुळे भविष्यात माेठा अपघात घडण्याची शक्यता आहे. यामुळे पुलावर हाेणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी पाेलिसांनी कठाेर भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...