आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक:मालेगावातील पाच ग्रामपंचायतींच्या सहा जागांसाठी रविवारी मतदान ; सोमवारी मतमोजणी

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या रिक्त सहा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. ५) मतदान होत आहे. ढवळेश्वर, अस्ताणे व निमगावला दुरंगी तर अजंग व दहिवाळच्या प्रत्येकी एका जागेसाठी तिरंगी लढत रंगली आहे. निवडणूक शाखेने मतदान प्रक्रियेची अंतिम तयारी पूर्ण करुन शुक्रवारी इव्हीएम मशीन सील केले. दरम्यान, डिसेंबर २०२२ ला मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभागरचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यासाठी सोमवारी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कारणांनी रिक्त झालेल्या पाच ग्रामपंचायतींच्या सहा जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अर्ज माघारीनंतर सहा जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. ढवळेश्वरच्या अनुसूचित जमाती व स्त्री राखीव या दोन जागांसाठी चार उमेदवारांमध्ये दुरंगी लढत होत आहे. अजंगला अनुसूचित जाती स्त्री राखीव तर दहिवाळच्या अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी तीन उमेदवारांमध्ये सरळ सामना आहे. निमगाव व अस्ताणेच्या सर्वसाधारण स्त्री राखीव जागेकरिता दुरंगी लढती रंगल्या आहेत. निवडणूक शाखेने सहा मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे.

आरक्षण सोडतीसाठी सोमवारी विशेष सभा

चांदवड राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी (दि. ६) आरक्षण सोडत काढण्यात येणार असून त्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रभागरचना कार्यक्रम पूर्ण करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कालबद्ध कार्यक्रम नियोजित केला आहे. त्यानुसार तालुक्यातील दहेगाव म., चिखलांबे, दुधखेड, दुगाव, दहिवद, डोणगाव, गणूर, कोकणखेडे, कुंदलगाव, खडकओझर-गुऱ्हाळे, मालसाणे, मेसनखेडे खुर्द, निंबाळे, विटावे, शिंगवे, पाटे-कोलटेक, आडगाव, रेडगाव खुर्द, साळसाणे, देवरगाव, तळेगावरोही, वाद, वडाळीभोई, खेलदरी, बोराळे, भुत्याणे, चिंचोले, तळवाडे, भाटगाव, नारायणगाव, दरेगाव, निमोण, काजीसांगवी, सोनीसांगवी, शेलू, पुरी या ३६ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत दि. ६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभेत काढण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...