आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिमगाव वाकडाच्या थेट सरपंचपदी ग्रामविकास पॅनलच्या पूजा दिगंबर गिते या विजयी झाल्या. निमगाव वाकडा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार पूजा दिगंबर दरेकर यांनी रेणुका ग्रामविकास पॅनलच्या मनीषा संदीप गायकर यांचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला. ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर व लासलगाव बाजार समितीचे संचालक संदीप (ललित) दरेकर यांनी केले होते.
या निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशीच प्रभाग ३ मधील उमेदवार संदीप दरेकर, अलका गायकर व सुरेखा गोधडे हे तीन उमेदवार अविरोध निवडून आले होते. उर्वरित प्रभागात मतदान होऊन त्यात प्रभाग १ मधील ग्रामविकास पॅनलचे उमेदवार सागर सस्कर तर रेणुका ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार तृप्ती ठेंगे व अपक्ष जयश्री गिते हे तीन उमेदवार विजयी झाले. त्याचप्रमाणे प्रभाग २ मध्ये रेणुका ग्रामविकास पॅनलचे उमेदवार रवींद्र गायकर, कमलाकर माळी व ज्योती पूरकर हे तीन उमेदवार विजयी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.