आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारब्बीत पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपांचा वापर पूर्ण क्षमतेने होऊ लागला आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र वगळता तालुक्यात विजेच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. डिसेंबर पासून टप्प्याटप्प्याने वाढत गेलेली मागणी ९० एमव्हीएपर्यंत पोहोचली आहे. गतवर्षी रब्बी हंगामाच्या तुलनेत २० एमव्हीएने ही मागणी जास्त आहे.
नोव्हेंबरपर्यंत ५० एमव्हीए इतकी वीज मागणी होती. टप्प्याटप्प्याने वाढ होऊन ही मागणी ९० पर्यंत पोहोचली आहे. सद्यस्थितीत ही मागणी स्थिर असली तरी अजूनही काही भागात कांदा लागवड सुरू असल्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत त्यात किरकोळ वाढ होण्याचा अंदाज आहे. किमान आणखी पाच एमव्हीएपर्यंत मागणी वाढू शकेल. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात अडीचपट घट झाली होती. पुरेसे क्षेत्र लागवडीखाली आले नव्हते. भूजल पातळी खालावलेली असल्याने शेतकऱ्यांनी जेमतेम पिके घेण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे गतवर्षी डिसेंबरअखेरीस ७० एमव्हीएपर्यंत मागणी नोंदविली गेली.
ग्रामीण वाहिन्यांवर चक्राकार पद्धतीने भारनियमन
राज्यात रब्बीचा हंगामा सगळीकडेच जोरात आहे. ही मागणी पुरवताना राष्ट्रीय पाॅवर ग्रीडकडून मागणी होताच सद्यस्थितीत दिवसाला किमान अर्धा तास तातडीचे भारनियमन केले जाते. १५ डिसेंबरपर्यंत मागणीत वाढ होत असल्यामुळे तातडीचे भारनियमन दररोज अडीच तासापर्यंत पोहोचले होते. सध्या मागणी स्थिर असल्याने ३० मिनिटापर्यंत भारनियमन केले जात आहे. ग्रामीण भागात नांदूरशिंगोटे, ठाणगाव अथवा सिन्नर परिसरातील ग्रामीण वाहिन्यांवर चक्राकार पद्धतीने ते टाकण्यात येते.
१९ हजार हेक्टरवर पेरणी
रब्बीचे २० हजार ६७५ हेक्टर इतके क्षेत्र आहे. पैकी १९ हजार ५७६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ची लागवडकेली आहे. गतवर्षी सात हजार २८५ हेक्टरवर लागवड झाली होती. तुलनेने अडीचपट क्षेत्र वाढल्याने वीज मागणी वाढली.
यामुळे दाब कमी
एकाच वाहिन्यांवर एकापेक्षा जास्त उपकेंद्रांना जोडण्या ट्रान्सफाॅर्मरवर क्षमतेपेक्षा जास्त जोडण्या रब्बी हंगामात वाढणाऱ्या अनधिकृत कृषी जोडण्या
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.