आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथरे बुद्रुक येथील वीज उपकेंद्रातून कोळगावमाळ येथील कृषी पंपांना कमी दाबाने वीज पुरवठा करण्यात येत आहे. शिवाय केवळ पाच तास वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पुरेसे पाणी देता येत नाही. वीज पुरवठा आठ तास व पूर्ण दाबाने करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार एकनाथ बंगाळे, महावितरणला मागणीचे निवेदन देण्यात आले.
मागणीची दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाथरे बुद्रुक वीज उपकेंद्रातून कोळगाव माळला वीज पुरवठा केला जातो. पाथरे बुद्रुक येथे वीज पुरवठा सुरू असताना कोळगावमाळ येथील सर्व वीज पुरवठा बंद करण्यात येतो. तथापि, कोळगाव माळ येथे पुरवठा करताना पाथरे बुद्रुक येथील ट्रान्सफार्मर सुरूच ठेवले जातात.
शहा येथील १३२ वीज केंद्र सुरू झाल्याने भरतपूर परिसर त्या केंद्रास जोडण्यात यावा, लक्ष्मणपूर परिसरातील ११ ट्रान्सफार्मर भरतपूरला जोडावे. त्यामुळे कोळगावमाळ येथे पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होऊ शकेल. देवपूर व शहा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्र शहा येथील १३२ केंद्राला जोडण्यात आली आहेत. त्यामुळे वावी व पाथरे बुद्रुक परिसराला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होईल, असे वाटले होते. परंतु, तसे झाले नाही.
याउलट कोळगावमाळ येथील शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होत होता, आता तो केवळ पाच तास केला जात आहे. शहा येथे पाचवा फीडर तातडीने बसवावा, पाथरे उपकेंद्र शहा येथे जोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. भाऊसाहेब थोरात, कारभारी जाधव, सुभाष गवांदे संजय चंद्रे, रमेश गवांदे, बाबासाहेब गवांदे आदींनी निवेदन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.