आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविंचूर येथील न्यू ब्लाॅसम्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या वर्षिक स्नेहसंमेलनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून स्वागत गीताने करण्यात आली. व्यासपीठावर विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, उपसरपंच शिरीन मोमीन, लासलगाव पत्रकार संघाचे असिफ पठाण, नीलेश देसाई, उमेश पारिक, संदीप शिरसाठ, नितीन गायकवाड, कलगिधर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक दीपक बाबरे, सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड संजय दरेकर, उपाध्यक्ष संतोष उशिर, सचिव अविनाश दुसाने आणि सर्व पदाधिकारी तसेच सुभाष उगले, दिलीप कोथमिरे , संजय झाल्टे, मयूर पाटील आदी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते स्काॅलरशिप परीक्षेत, इंग्रजी ऑलिंपियाड स्पर्धेत व खेळांच्या स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून गौरवण्यात आले. मुख्याध्यापिका ज्योती माठा यांनी वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. नृत्यांची सुरुवात श्री गणेश वंदनाने करून एकाहून एक सरस नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.
सूत्रसंचालन अमोल संसारे, सुमित्रा व्यास तसेच स्वरूपा कापडणीस, प्रतिक्षा दहिफळे, संस्कृती ठुबे, सेजल शेवाळे यांनी केले. यावेळी समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूजा निकम, समन्वयक माधवी सहाय, शालेय सांस्कृतिक समिती सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.