आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंतापूर (ता. बागलाण) येथील एका शेतकऱ्याने आपल्या गायीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्यानंतर आठवण म्हणून गाईचे मंदिर उभारले. या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला.
येथील ह.भ.प. रावण झिंगू अहिरे यांनी वीस वर्षांपूर्वी एक वासरू पाळले होते. वृद्धापकाळाने त्यांच्या नळबारी शिवारातील शेतात त्या गायीचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी मृत्यू झाला. अहिरे यांनी घरासमोर गायीची विधिवत पूजा करून अंत्यसंस्कार केले.
नाथपंथी असलेल्या रावणदादांनी आपले दोन्ही मुले जिभाऊ व भिकाकडे आपल्या गायीच्या आठवणीसाठी मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांच्या इच्छेखातर दोन्ही भावांनी शेतातील घरासमोर गोमातेचे मंदिर उभारले. मंदिराचा कळस लोकवर्गणीतून उभारला. मंदिराची प्राणप्रतिष्ठा गुरुमाऊली कृष्णाजी जायखेडकर यांच्या कृपाशीर्वादाने व खिरमाणी येथील जितेंद्रदास महाराज, खमताणे येथील विश्वेश्वर महाराज, रावण दादांचे शिष्य पोपट महाराज मोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. रविवारी मुरलीधर महाराज कडरेकर यांच्या किर्तनाचा कार्यकम झाला.ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात गोमाता, नंदी व महादेवाची पिंड यांची अंतापुर गावातून मिरवणूक काढण्यात आली.
यात विठ्ठल खैरनार, ज्ञानेश्वर खैरनार, दीपक खैरनार, अतुल खैरनार, किशोर खैरनार, शरद खैरनार, अंकुश खैरनार, कारभारी पाटणकर, सोपान खैरनार, समाधान जगताप, दिलीप निकम, संजय पाटणकर, सर्जेराव सुरसे, अर्जुन सुरसे यांच्यासह सावता भजनी मंडळ, नयन महाराज भजनी मंडळ व भाविक सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.