आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:प्राचार्य डॉ. खराटे यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार

येवला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकलहरे येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे देण्यात येणारा आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या पुरस्काराचे वितरण प्राचार्य डॉ. सुधाकर शैक्षणिक संकुल जाधवर चौक पुणे येथे झाले. माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. खराटे हे मागील ३५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता होते. त्यांचे विधानपरिषद आमदार नरेंद्र दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे, संस्थेचे सचिव कुणाल दराडे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...