आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ प्रतिपादन ; आदर्श स्वराज्य निर्मितीमुळे प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवरायांचे आदराचे स्थान

सिन्नर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान आहे. स्वराज्य आणि स्वराज्यातील आदर्श व्यवस्था, दया करण्याचे तत्व, सर्व समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे त्याचे कारण असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी केले. सिन्नर महाविद्यालयात झालेल्या शिवस्वराज्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रा. एस. पी. जाधव, प्रा. डी. के. खुर्चे, प्रा. अर्चना पगार, प्रा. स्मिता शिंदे, डगळे, सोनवणे यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी उपस्थित होते.प्राचार्य रसाळ म्हणाले की, त्यांच्या सैन्यात अठरापगड जातीच्या लोकांचा समावेश होता, परंतु सर्वांना समान वागणूक देणारा राजा अशीच महाराजांची ओळख होती.

आधी केले मग सांगितले हे त्यांचे तत्त्व होते. राज्यव्यवस्था, कुटुंब व्यवस्था, न्यायव्यवस्था आणि समाजव्यवस्था कशी असावी याचे सर्वोत्तम आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कर्तृत्वातून उभे केले. शेतकरी आणि स्त्रियांविषयी प्रचंड आदर होता, असे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवरून दिसून येते. उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने जाणता राजा होते. शिवराज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील सर्वात आनंददायक सोहळा होता असे ते म्हणाले. प्रा. वाय. एल. भारस्कर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. बी. कर्डक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. बी. भिसे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...