आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस वितरण:अमृत महोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा मालेगाव व आरोग्यसंपदा योगा परिवार यांच्या वतीने दि.२ ते ९ मे दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बिहार ब्रह्मकुमारीज झोनच्या मुख्य संचालिका राणीदीदी, बुऱ्हाणपूर ब्रह्मकुमारीज झोनच्या मुख्य संचालिका मंगलादिदी, मालेगाव ब्रह्मकुमारीज सेंटरच्या मुख्य संचालिका शकुंतलादिदी, ब्रह्मकुमारी ममतादिदी, उज्ज्वलादिदी, सीतादिदी, डॉ. शीतल मेहता, सचिन शहा, राजेंद्र भामरे, डॉ. उज्ज्वल कापडणीस, डॉ. मनीषा कापडणीस, डॉ. मल्हार देशपांडे, डॉ. अर्चना देशपांडे, महेंद्र कासार, प्रा. जगदीश खैरनार, गौतम शहा व सरिता शहा आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना व इतर सहभागी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. मनीषा कापडणीस, पूनमदिदी व प्रा. नीलम विसपुते यांनी केले. कार्यक्रमासाठी ब्रह्मकुमारीस संस्था परिवारातील साधकांनी व आरोग्यसंपदा योगा परिवारातील साधकांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...