आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक‎:शिंगवे येथे संत रोहिदास महाराज‎ जयंतीनिमित्त मिरवणूक‎

चांदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिंगवे येथील ग्रामपंचायत‎ कार्यालयात श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज‎ यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात अाले.‎ याप्रसंगी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य सुखदेव‎ बोरसे, सरपंच आत्माराम खताळ, उपसरपंच नंदू‎ खताळ, शिवाजी पाटील, रामा खताळ, भारत‎ खताळ, रमण डावरे, अनिल मढे, दादा अहिरे‎ आदी मान्यवरांसह नागरिकांकडून संत रोहिदास‎ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.‎

तसेच सायंकाळी संत रोहिदास महाराज यांच्या‎ प्रतिमेची जल्लोषात मिरवणूक काढण्यात करण्यात‎ आली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.‎ या कार्यक्रमाचे नियोजन रामदास डावरे, रमण‎ डावरे, राजू डावरे, शंकर डावरे, कृष्णा डावरे,‎ सचिन डावरे, आकाश डावरे, गोपाल डावरे‎ आदींनी केले. कार्यक्रमास समाजबांधव व ग्रामस्थ‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...