आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मालेगाव येथे श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा; जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की जयच्या घोषणांनी शहर दुमदुमले

मालेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज शहरात श्रीरामजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये लहान मुलांपासून आबालवृध्द शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की जय च्या गगनभेदी घोषणांनी शहर दणाणले होते.

श्रीराम नवमीच्या निमित्ताने आज सकाळी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष चंदू जाधव यांनी पुजा केल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी किशोर महाकाळ, संतोष तिखे, रामदास बळी, प्रशांत भेराने, वैभव वायचाळ, संदीप पिंपरकर, गणेश दण्डगे, सुनील शर्मा, आशिष बळी, विनोद बांनाइतकर, अंकित अग्रवाल, गोविंद अहिर, अरुण बळी, मोहन बळी, गणेश राऊत, अॅड. शकर मगर, सागर अहिर, गोपाल इंगळे, गोविद तोंडे, गोपाल चोपडे, संतोष बळी, पवन ईरतकर, आशिष डहाळे, अभि देवकते, गणेश अहिर, सोनू अहिर, ऋषिकेश सारस्कर आदी हजर होते. गांधी नगरातील भगतसिंग चौकातील हनुमान मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यांनतर मिरवणूक लहुजी उस्ताद चौक नगर पंचायत समोरून शिव चौकातील राम मंदिरात आली तेथून या मिरवणुकीला खास प्रारंभ झाला एका पालखीत प्रभू श्रीराम याची मूर्ती विराजमान केली होती.

एका रथावर प्रभू राम लक्ष्मण आणि सीता याची प्रतिमा सजवण्यात आली होती. रंगीबेरंगी लाइट आणि फुले यांनी सजवण्यात आले होते.ही मिरवणूक गांधी चौक मेडिकल चौक बस स्थानक त्यांनतर वंदे मातरम चौक तेथून। महात्मा फुले चौक जय भवानी मंदिर खवले वेताळ तेथून मराठी शाळे जवळून परत शिव चौक येथून पुन्हा राम मंदिरात आली होती. तेथे कारंजे चा भव्य देखावा सादर करण्यात आला होता. मिरवणूक दरम्यान ठिक ठिकाणी स्वागत करणयात आले होते. फटाक्यांची अतिष बाजी करण्यात आली होती. ठिकठिकाणी चहा सरबत खिचडी मठ्ठा वाटप करण्यात आले होते. महिला भगिनी यांनी दर्शन घेतले.पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. शहर भगवे मय झाले होते. अतिशय धार्मिक आणि शांततेच्या मार्गाने ही मिरवणूक पार पडली.