आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोनांबे येथे श्री सिन्नर दशनाम गोसावी समाज संस्थेतर्फे आद्यगुरू शंकराचार्य जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, व्याख्यान, कार्यकारिणी बैठक, गौरव कार्यक्रम पार पडले.
संस्थेचे अध्यक्ष भानुदासपुरी गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष किरण डगळे, डॉ. राजेंद्र गोऱ्हे, सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार, माजी नगरसेवक सोमनाथ पावसे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष व उद्योजक तानाजी पवार, गोवर्धन पतसंस्थेचे अध्यक्ष रामनाथ डावरे आदी उपस्थित होते.
श्री दशनाम गोसावी आखाड्याचे साधू बबन पुरी, ज्ञानेश्वरगिरी यांच्या हस्ते धर्मध्वज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्री नागेश्वर महाराज यांची संजीवन समाधी, आद्यगुरू शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बबनपुरी गोसावी, धनंजय गोसावी, रतनपुरी गोसावी यांनी समाधीपूजेचे पौरोहित्य केले.
वसंत गोसावी यांनी आद्यगुरू शंकराचार्य यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. यावेळी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान करण्यात आला. शरद रत्नाकर यांनी सुत्रसंचालन केले.
संस्था मंडळाची फेरनिवड
सरचिटणीस वसंत गोसावी यांनी पाच वर्षांचा अहवाल, जमा-खर्च व तेरीजपत्रक, ऑडिट रिपोर्ट सादर केला. कार्यकारिणी मंडळाची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. सोमनाथगिरी यांनी मांडलेल्या प्रस्तावास सुधीरगिरी यांनी अनुमोदन दिले. दीपाली गोसावी, वंदना गोसावी यांची महिला सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सुरेश गोसावी यांची सिन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, रामभारती गोसावी यांची सोनांबे सोसायटीत निवड झाल्याने गौरव करण्यात आला. याप्रसंगी त्र्यंबकगिरी गोसावी, रवींद्रगिरी, नंदकिशोर गोसावी, ईश्वर गोसावी, ब्रह्मगिरी गोस्वामी, दिलीप गोसावी, भागवत गोसावी, श्यामगिरी गोसावी, छगन गोसावी, भाऊगिरी गोसावी, संजयकुमार गोसावी, भाऊसाहेब गोसावी, ललिता गोसावी आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.