आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रस्ते दर्जोन्नोत झाल्यास ग्रामीण विकासाला चालना;आमदार दिलीप बोरसे यांचे प्रतिपादन, बागलाण तालुक्यात रस्त्यांचे भूमिपूजन

सटाणा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागलाणच्या पश्चिम भागातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी रस्ते दर्जोन्नोत करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी लवकरच जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याचे स्पष्ट करून रस्ते दर्जोन्नोत झाल्यास रस्त्यांचे जाळे मजबूत होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन आमदार दिलीप बोरसे यांनी केले.

बागलाण तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या चार कोटी ६२ लाख रुपयांच्या मंजूर झालेल्या रस्त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. ५) पार पडला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीप बच्छाव, सटाणा बाजार समितीचे सभापती पंकज ठाकरे, संचालक संजय सोनवणे, तुकाराम देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर ठाकरे, सोमनाथ सूर्यवंशी उपस्थित होते. आमदार बोरसे पुढे म्हणाले की, चौंधाणे येथील रामगीर बाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटनामधून सुमारे दोन कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. त्या धर्तीवर तालुक्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. केरसाणे, चौंधाणे-जोरण, निकवेल-जोरण, जोरण-दहिंदुले, भावनगर-करंजखेड, पठावे दिगर येथे पूल बांधणे, पिसोरे रस्ता, तळवाडे दिगर येथे पूल बांधणे आदी विकासकामांचे भूमिपूजन आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, शाखा अभियंता शेखर पाटील, चौंधाणेच्या सरपंच लीलाबाई मोरे, राकेश मोरे, जोरणचे सरपंच सुभाष सावकार, दिनेश सावकार, काकाजी देवरे, कैलास सावकार, हेमंत पवार, सुकदेव सावकार, चित्रा मोरे, संतोष जाधव, यशवंत सोनवणे, विजय वाघ, बाळासाहेब वाघ, संदीप सोनवणे, सुशील सोनवणे, रवींद्र सोनवणे, संजय अहिरे, राजेंद्र मोरे, महादू सावकार, यशवंत देशमुख, संजय वाघ, राजेंद्र पवार, नीलेश अमृतकर, पीयूष सूर्यवंशी, मयूर आहेर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...