आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात ‘दिव्य मराठी’चे पत्रकार शंकर वाघ यांच्यावर जमावाने केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. मालेगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. १७) अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना निवेदन देण्यात आले. हल्लेखाेरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
सटाणारोड भागात गुरुवारी दुपारी वैद्य हॉस्पिटलजवळ दोन गटांत हाणामारी सुरू होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचे वार्तांकन करत असताना जमावाने पत्रकार शंकर वाघ यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात वाघ यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली अपर अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखण्यासाठी दमदाटी करणे, हल्ला चढविणे असे गैरप्रकार होत आहेत.
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना कायद्याच्या दणक्याने ठेचून काढण्याची मागणी करण्यात आली. अपर अधीक्षक खांडवी यांनी संबंधित घटनेचा तपास उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्याकडे सोपविला असल्याचे सांगितले. संशयितांना अटक न झाल्यास सोमवारी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी पत्रकार हेमंत शुक्ला, प्रमोद सावंत, शंकर वाघ, बिपीन बागूल, श्रीकांत वाघ, ब्रिजमोहन शुक्ला, अतुल शेवाळे, जहूर खान, मुजम्मील इनामदार, मगनसिंग पाटील, सुदर्शन पगार, निवृत्ती बागूल, मनोहर शेवाळे, नरेंद्र देसले, नीलेश शिंपी, हेमंत धामणे, चेतन महाजन, समीर दोशी, शफीक शेख, राजीव वडगे, संदीप जेजूरकर आदी उपस्थित होते.
मनमाडलाही पत्रकार संघातर्फे हल्ल्याचा निषेध
मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने मालेगाव येथील ‘दिव्य मराठी’चे ब्युरो चीफ शंकर वाघ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. मंडल अधिकारी सागर जोपुळे व प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना निवेदन देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तालुका समन्वयक अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, स्वाती गुजराथी, अशोक परदेशी, सतीश शेकदार, नरहरी उंबरे, अजय सोनवणे, नीलेश वाघ, अशोक बिदरी, उपाली परदेशी, तुषार गोयल, संदीप देशपांडे, योगेश म्हस्के, अफरोज अत्तार, नीलेश व्यवहारे, नाना आहिरे, आनंद बोथरा, हुसैनी टिनवाला, सॅमसन आव्हाड आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.