आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदाेलन:बाेरी अंबेदरी कालवा बंदिस्त कामास विराेध

मालेगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाेरी अंबेदरी व दहिकुटे धरणांच्या बंदिस्त कालवे प्रकल्पास विराेध दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांनी साेमवारपासून बेमुदत धरणे आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत कालवे बंदिस्त हाेऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.२५ काेटींच्या निधीतून बाेरी अंबेदरी व दहिकुटे प्रकल्पांचे कालवे बंदिस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवून जाेरदार घाेषणाबाजी केली हाेती. बाेरी अंबेदरी कालव्यातून वाहणाऱ्या पाण्यावर दहिदी, वनपट, टिंगरी व राजमाने येथील शेतकऱ्यांचे ९१० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

कालव्यावरच परिसरातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. त्यात कालवे बंदिस्त झाल्यास हा परिसर पूर्णत: ओसाड हाेईल. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता कालवे बंदिस्त याेजनेचे काम तातडीने थांबविण्याची मागणी केली हाेती. मात्र, शासनस्तरावर मागणीची दखल घेतली जात नसल्याने आता साेमवारपासून अंबेदरी धरण परिसरात धरणे आंदाेलन सुरू केले जाणार आहे. जाेपर्यंत काम थांबविले जात नाही ताेपर्यंत धरणे आंदाेलन सुरू राहील, असे शेतकरी भूषण कचवे यांनी सांगितले.

आंदाेलनात शरद शिंदे, विशाल शिंदे, देविदास शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप शिंदे, साेनू शिंदे, मंगलदास सिसाेदे, साेपान निकम, दीपक खैरनार, सुनील निकम, समाधान शिंदे, रणधीर भीमराव,दीपक शिंदे, काकाजी कचवे, प्रमाेद कचवे, निवृत्ती अहिरे, नंदलाल कचवे, समाधान कचवे, संदीप कचवे, प्रवीण कचवे, भीमराव कचवे आदी सहभागी हाेणार आहेत.

जाहिरनाम्याचा विसर
विधानसभा निवडणुकीत बाेरी अंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढविण्याचे आश्वासन दिले गेले. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात उंची वाढविण्याचा मुद्दा आवर्जून लिहिणाऱ्या नेत्यांना त्याचा आता साेयीस्कर विसर पडला आहे. प्रकल्पाची उंची वाढविली, खाेलीकरण केले तर जलस्तर वाढेल. मात्र, हे काम साेडून कालवे बंदिस्त करण्याचा खटाटाेप सुरु आहे. शेतकऱ्यांना देशाेधडीला लावण्याचा उद्याेग हाेत असल्याचा आराेप शेतकरी शरद शिंदे यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...