आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:खासदार राऊतांच्या अटकेचा निषेध; मनमाडला शिवसैनिकांचा मोर्चा

मनमाड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत अटक केल्याच्या निषेधार्थ शिवसेना शहर शाखेतर्फे सोमवारी (दि. १) सकाळी मनमाड शहरातून घोषणा देत मोर्चा काढला त्यानंतर एकात्मता चौकात निदर्शने करत धरणे आंदोलन केले. यावेळी ‘शिवसेना झिंंदाबाद, संजय राऊत यांच्या अटकेचा निषेध असो’ अशा घाेषणा देत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला.

जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, सहसंपर्कप्रमुख अल्ताफ खान, प्रवीण नाईक, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, सुनील पाटील, प्रवीण सूर्यवंशी, अॅड. सुधाकर मोरे, स्वराज देशमुख, मुराद शेख, खालीद शेख, हर्षल भाबड, राजाभाऊ आहेर, हरिष आशर, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश हिरण, प्रवीण धाकराव, योगेश देशपांडे, सनी फसाटे, महिला आघाडी शहरप्रमुख सुरेखा मोरे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मुक्ता नलावडे, माजी नगरसेविका किरण शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली ईडी शिवसेना नेत्यांवर आकसबुद्धीने कारवाई करत आहे. या कारवाईचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...