आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांना निवेदन:खासदार राऊतांच्या अटकेचा निषेध; दिंडोरीत रास्ता रोको

दिंडोरी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतल्याने दिंडोरीत शिवसेनेच्या वतीने साेमवारी (दि. १) शिवसेना कार्यालयापासून माेर्चा काढत नाशिक-कळवण राज्यमार्गावर रास्ता रोको करत निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार व ईडीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला त्यानंतर नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश डोखळे, उपजिल्हा संघटक सतीश देशमुख, उपजिल्हाप्रमुख नाना मोरे, कैलास पाटील, विलास निरगुडे, नारायण राजगुरु, सुनील मातेरे, संतोष मुरकुटे, विश्वास गोजरे, नदीम सय्यद, संगम देशमुख, किरण कावळे, नीलेश शिंदे, अविनाश वाघ, विठ्ठल अपसुंदे, रावसाहेब जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...