आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:भाजप आमदार बंब यांचा निषेध, शिक्षकांची निदर्शने

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध व शासनाने काढलेला आमचे गुरुजी हा अध्यादेश मागे घ्यावा यासह अन्य मागणीसाठी शिक्षकांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.आमदार बंब यांच्या विरोधात निदर्शने करून घोषणाबाजी केली. मालेगाव महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ, मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफ, मालेगाव तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्तपणे हे आंदोलन झाले.

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी बारा ते पाच या वेळात आंदोलन करण्यात आले. आंदोलनास फिरोज बादशहा, आर. डी. निकम, रईस अहमद, अनिल अहिरे, सचिन देशमुख, आशिष पवार, एजाज अहमद, निंबा बोरसे, साहेबराव देवरे, पी. एस. मोहिते, निर्मला अहिरे, खैरनार आदींसह शिक्षक सहभागी झाले होते.

आंदोलकांच्या मागण्या
सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. मूल्यांकन झालेल्या व मूल्यांकनास पात्र असलेल्या,शाळा व तुकड्यांना अनुदान जाहीर करावे. २० व ४० टक्के अनुदानावरील शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे शंभर टक्के अनुदान द्यावे. शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा रद्द करण्यात येऊन, शिक्षक भरती सुरू करावी. सरसकट विनाअट निवड श्रेणी द्यावी. कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसी सुरू करण्यात यावी. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती तात्काळ करावी. आरटीई प्रमाणे विद्यार्थी संख्येप्रमाणे शिक्षक मंजुरी देण्यात यावी व शिक्षक भरती करण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...