आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:इगतपुरी पंचायत समिती‎ कार्यालयाबाहेर आंदोलन‎

इगतपुरी‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी पंचायत समिती कार्यालयाबाहेर नवीन पेन्शन‎ योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी,‎ तसेच विविध मागण्यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक‎ संघटना, जिल्हा कमिटी महासंघ, शिक्षक समिती‎ संघटना, डीसीपीएस संघटना, शिक्षक भारती संघटना,‎ आरोग्य संघटना, आदिवासी शिक्षक संघटना, पदवीधर‎ शिक्षक संघटना, समता परिषद संघटना, स्वाभिमानी‎ संघटना, मागासवर्गीय संघटनेचे हजारों पदाधिकारी‎ यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. यावेळी या विविध‎ संघटनांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.‎

यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद ठाकरे,‎ अध्यक्ष दीपक पगार, सचिव रामेश्वर बाचकर, महासंघ‎ अध्यक्ष विजयराज जाधव, विस्तार अधिकारी संजय‎ पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाेळे, संदीप निरभवणे, ज्ञानेश्वर‎ पाटील, आनंद पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षिका,‎ आरोग्याचे हजारो कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...