आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:मालेगावी इमाम कौन्सिलची निदर्शने ; नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी

मालेगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा इमाम कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी निषेध केला. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घाेषणाबाजी व निदर्शने करत भाजपच्या निलंबित तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. पोलिसांनी शर्मा व जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. इमाम कौन्सिलच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचा फलक झळकात निदर्शने केली. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात मौलाना इरफान दौलत नदवी, जुबेर काजी, अतिक कामरान, आबिद गफूर, उबेदूर रहेमान, मुस्तफा हबीब रहेमान आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...