आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज उपलब्ध:शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीज उपलब्ध करून द्या

येवला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पिक लागवडीची काम सुरू आहे. त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्णवेळ दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, त्यांचे विजेचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे, अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मतदासंघांतील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या असलेल्या विजेचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, शेतकऱ्यांनी देखील शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन टप्याटप्याने बिल भरावे असे, त्यांनी सांगितले.

लोणारी कुटुंबीयांचे शहरासाठी महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या माध्यमातून शहरात सुमारे अडीचशे बाकांचे वाटप करण्यात येत आहे. त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार किशोर दराडे, तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, अंबादास बनकर, अरुणमामा थोरात, संभाजी पवार, वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, बंडू शिरसागर, दीपक लोणारी, सचिन कळमकर, अकबर शहा, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, राजेश भांडगे, प्रवीण बनकर, मंगेश जाधव, निसार शेख, रतन बोरनारे, सनी पटनी, मुश्रीफ शहा, प्रसाद पाटील, सरपंच मंदाकिनी पाटील, भोला लोणारी आदी उपस्थित हाेते.

अतिक्रमण धारकांवर कारवाई करा
अतिक्रमण करून गावातील नागरिकांच्या विकास कामांना अडथळा निर्माण करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी सबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...