आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे आंदोलन:उपजीविकेसाठी प्रांत कार्यालय परिसर तर निवासासाठी शासकीय बांगला द्या ; अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिर्के कुटुंबियांचे धरणे

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपविभागीय दंडाधिकारी यांनी गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांना धार्मिक स्थळापासून दोनशे मीटर अंतरावर थांबण्यास, वाद्य वाजविण्यास, घोषणा देण्यास बंदी घातल्याचा आदेश काढला आहे. मुळात आपले निवासस्थान व व्यवसाय धार्मिक स्थळांपासून २० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे आदेशाचे पालन करताना आपल्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा शासकीय बंगला निवासासाठी व उपजीविकेसाठी प्रांत कार्यालयाचा परिसर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत शिर्के यांनी कुटुंबासह अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

मच्छिंद्र शिर्के यांचे राहते घर व व्यावसायासाठी गाईचा गोठा हा नवदुर्गा माता व विठ्ठल रूक्मिनी मंदिर, नवदुर्गा नगर, कलेक्टर पट्टा या धार्मिकस्थळापासून अवघे तीन मीटर अंतरावर आहे. शिर्के परिवारासोबत घरी असताना किंवा गाईना चारा पाणी करताना दिवस रात्र या धार्मिक स्थळाच्या जास्तीत जास्त २० मीटरच्या आत राहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या राहण्याचा व उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाल्याचे शिर्के यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपली परिवारासोबत राहण्याची व्यवस्था व व्यवसायासाठी गाई-गुरांची चारा पाण्याची व्यवस्था करावी, यासाठी शासकीय बंगला आणि कार्यालय १५ मेपर्यंत उपलब्ध करून दयावे, अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...