आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक बांधिलकी:विधवा पुनर्विवाहावर क्रांतिवीर मधून प्रबाेधन तर अनिष्ट प्रथांवर प्रहार; कळवण येथील कृष्णा फ्रेंड्स सर्कलने सादर केली नाटिका

कळवण24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपघातांमुळे उद्भवणाऱ्या समस्या, व्यसनांमुळे होणारे कर्ज आणि संसाराची झालेली राखरांगोळी यावर विधवा पुनर्विवाहावर आधारित ‘क्रांतिवीर’ नाटिका सादर करत समाज प्रबाेधन केले जात आहे. येथील कृष्णा फ्रेंड्स सर्कलने समाजप्रबोधनाची परंपरा कायम ठेवली आहे.

मंडळाने कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी तसेच यानंतर घ्यावयाची काळजी, दुसऱ्या लाटेत झालेल्या हानीची तीव्रता, वाढते वृद्धाश्रम, अनाथांचे जीवनमान, खेळ आणि देशभक्ती, शिक्षण आणि देव, राजकारणातून हरवलेले समाजकारण, व्यवसायातून समाजकारण, मोबाइल शाप की वरदान, माणुसकीचा झरा, बालपणीचे संस्कार अशा विविध विषयांवर लेखक दीपक वेढणे यांच्या संकल्पनेतून प्रकाशझोत टाकला आहे. याच अनुषंगाने यावर्षी क्रांतिवीर नाटकाच्या प्रयोगांसाठी गर्दी वाढत आहे.

या प्रयोगाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार नितीन पवार, तहसीलदार बंडू कापसे, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, जयश्री पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, विकास देशमुख, विलास शिरोरे आदींनी कौतुक केले. मंडळाचे संस्थापक सुहास भावसार, अध्यक्ष नितीन कोठावदे, उपाध्यक्ष बापू कुमावत, गौरव वानखेडे, चंद्रकांत बुटे, विलास अमृतकर, सुहास भावसार, संजय येवले, अनिल महाजन, महेश बिरारी, दीपक वेढणे आदी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न करीत आहेत. याशिवाय उमाकांत कोठावदे, दीपक पगार, नंदू मोहन, नितीन संचेती, महेश बिरारी, सुनील जैन, विलास शिरोरे, जितेंद्र कापडणे, आप्पा खैरनार, मधू खैरनार, सोमनाथ खैरनार, नंदकिशोर कुलकर्णी, किशोर अमृतकार, संजय भावसार आदींचा या मंडळात समावेश आहे.

नाटकातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न
समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद पडल्या असल्या तरी काही ठिकाणी विधवा महिलांची होणारी कुचंबणा बघून समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी क्रांतिवीर या नाटिकेचे लेखन केले आहे. या नाटकातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न आहे.
दीपक वेढणे, नाटिकेचे लेखक

बातम्या आणखी आहेत...