आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसराची दुर्दशा:शिवसृष्टीसाठी पं. स.ची जुनी जागा हस्तांतरित

नांदगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसृष्टी उभारण्यासाठी जागा उपलब्ध झाल्याने नांदगाव शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. मालेगाव रस्त्यावर असणाऱ्या येथील पंचायत समितीच्या सर्व विभागांच्या कार्यालयांचे औरंगाबाद रस्त्यावरील प्रशासकीय संकुलात स्थलांतर झाल्याने येथील मोठ्या भूखंडाचा वापर होत नसल्याने, रस्त्यालगत असलेल्या या परिसराची दुर्दशा झाली होती.

शहरानजीक परंतु गर्दीपासून दूर असणारी व मोक्याच्या ठिकाणी असणारी जुन्या पंचायत समितीची जागा शिवसृष्टी उभारण्यासाठी सर्वाथाने योग्य असल्याने आमदार कांदे यांनी शासनदरबारी ही जागा बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न केले होते. गत महिन्यात राज्य शासनाचे अवर सचिव केशव जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना ही जागा बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेने कार्यवाही करत जुन्या पंचायत समितीची १.२१ हेक्टर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केली आहे.या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा, शिवशाहीतील ठळक घडामोडींचे शिल्प, तैलचित्रे, भित्तिचित्रे, येणाऱ्या नागरिकांसाठी अम्युझमेंट पार्क, बगीचा आदी सुविधा उभारल्या जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...