आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त शनिवारी (दि. ४) तालुक्यातील उसवाड येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त तोंडाचा व स्तनाचा कर्करोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली. एसएनजेबी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. सुनीलकुमार बागरेचा, विश्वस्त नंदकिशोर ब्रम्हेचा, समन्वयक सुमतीलाल सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस एकक व कम्युनिटी औषध विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसह उसवाड गावात रॅली आयोजित करून जनजागृती करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू आणि तोंडाच्या कर्करोगाबाबत गट चर्चा घेण्यात आली. स्वयंसेवकांनी डिजिटल पोस्टर निर्मिती करून सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली. कॅन्सर लवकर ओळखण्यासाठी विद्यार्थिनी आणि समाजातील महिलांमध्ये स्वत: स्तन तपासणीबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. अजय दहाड यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना तंबाखू व मद्यपान हेच कर्करोगाचे मुख्य कारण असल्याचे सांगितले. यादरम्यान प्राथमिक शाळा उसवाड येथील विद्यार्थ्यांना बिस्किट्स वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी उसवाड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सोनवणे यांचे सहकार्य केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. अमित जगझाप, डॉ. ए. एस. पारीक, डॉ. एस. पी. त्रिपाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.