आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्करोग ही गंभीर समस्या असून, समाजात वाढत असलेले त्याचे प्रमाण चिंतनीय आहे. तरुणपिढी विविध व्यसनाच्या विळख्यात अडकली असून त्यातून बाहेर पडण्यासाठी समाजजागृतीची गरज आहे. गुटखा, तंबाखू, धूम्रपान टाळण्यासाठी संतुलित आहार व व्यायाम याची गरज आहे, असा सूर जागतिक कर्करोग दिनानिमित्त सिन्नर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती रॅलीच्या निमित्ताने मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आला. येथील बसस्थानक पासून निघालेली नेहरू चौक, गणेशपेठ, छत्रपती शिवाजी चौक, वावी वेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जात तहसील कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीत अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक महेश देशपांडे, राज्य फार्मसी कौंसिलचे सदस्य अतुल अहिरे, सुदेश आहेर, प्रवरा फार्मसी कॉलेजचे प्रा. विकास कुंदे, सुरेश नावंदर, जिल्हा केमिस्ट संघटनेचे स्वीकृत सदस्य अतुल झळके, सहसचिव सचिन वाळुंज, सिन्नर केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी संदीप चतुर, अमित दराडे, शिवाजी थोरात, राजेंद्र हांडोरे, अनिल वाजे, जयेश गाढवे, अभिषेक खरडे, अजिंक्य मुदबखे, अनिल थोरात, सिराज काद्री, रखमा लहानगे, जगदीश भन्साळी, दिलीप कराड, गणराज हांडे तसेच प्रवरा फार्मसी कॉलेजच्या सर्व विद्यार्थिनी, केमिस्ट सहभागी झाले होते.
जनजागृती रॅलीमध्ये विद्यार्थिनींनी कर्करोग टाळा, व्यसने सोडा, गुटखा, तंबाखू सेवन करू नका, संतुलित आहार, व्यायाम करा अशा आशयाची घोषवाक्ये असलेले फलक हाती घेऊन घोषणा दिल्या . समारोप तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अशोक स्तंभानजिक झाला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक महेश देशपांडे, अतुल अहिरे, सुदेश आहेर, अतुल झळके, विकास कुंदे यांनी कर्करोग जागृती अभियानाची माहिती देऊन मनोगत व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.